बंद

जिल्ह्याविषयी

अकोला जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य पूर्वेकडे वसलेला आहे. हा जिल्हा उत्तर अक्षांश 20.17 ते 21.16 आणि पूर्व रेखांश 76.7 ते 77.4 चे दरम्यान वसलेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला गाविलगडचे डोंगर असून पूर्वेकडे अमरावती जिल्ह्यातील  अंजनगाव, दर्यापूर व नांदगाव खंडेश्वर तहसील व वाशीम जिल्ह्यातील कारंजा तहसील आहे. दक्षिण बाजूला वाशिम जिल्हा आणि पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
अकोला जिल्हाचे क्षेत्रफळ 5428 चौ.कि.मी. असून ते महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या 1.76% आहे. अकोला जिल्ह्यामध्ये अकोला तहसीलचे क्षेत्रफळ सर्वात जास्त म्हणजे 1134.13 चौ.कि.मी.असून तेल्हारा तहसीलचे क्षेत्रफळ सर्वात कमी म्हणजे 628 चौ.कि.मी. आहे.

अकोला जिल्ह्यामध्ये अकोला, बाळापुर, पातुर, बार्शीटाकळी, मुर्तीजापूर, अकोट व तेल्हारा अशा ७  तहसील आहेत. जिल्ह्याचे विभाजन करून वाशीम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
जिल्ह्यात अकोला येथे अकोला शहर महानगरपालिकेची स्थापना १ ऑक्टोबर २००१ रोजी करण्यात आली.जिल्ह्यात १ महानगरपालिका,५ नगर पालिका,१ नगर पंचायत.जिल्ह्याचे मुख्यालय अकोला येथे तर विभागीय मुख्यालय अमरावती येथे आहे.

भौगोलिक रचना

अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र अकोला हे आहे.अकोला जिल्हा हा अमरावती प्रशासकीय विभागात येतो.जुलै १, इ.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशीम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशीम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.

भौगोलिक क्षेत्रफळ

अकोला जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ क्षेत्रफळ चौ.कि.मी.
अकोला क्षेत्र ५,४२८ चौ.कि.मी.

भौगोलिक रचना

अकोला जिल्ह्याचे भौगोलिक स्थान स्थान पदवी
उत्तर उंची २०.ते २१.१६
पूर्व उंची ५.६

तापमान आणि पर्यजन्यमान

अकोला जिल्ह्यातील हवामान आणि पाऊस पाऊस / हवामान
जिल्ह्यातील सरासरी पाऊस ७५० ते१००० मिमी
किमान तापमान ३५.५ अंश सेल्सियस
कमाल तापमान ४५.९अंश सेल्सियस

ओलीत अंतर्गत क्षेत्रफळ

अकोला जिल्ह्यातील ओलीत अंतर्गत क्षेत्रफळ क्षेत्रफळ
सिंचन क्षेत्र २२,५०४ हेक्टर
मोठे प्रकल्प २(काटेपूर्णा आणि वान)
मध्यम प्रकल्प ३(मोर्ना, निरगुणा आणि उमा)
इतर प्रकल्प ३

लोकसंख्या(२०११)

अकोला जिल्ह्याची लोकसंख्या(२०११)जनगणना अहवाल नुसार लोकसंख्या
एकूण १८,१८,६१७
पुरुष ९,३६,२२६
स्त्री ८,८२,३९१

साक्षरता प्रमाण(२०११)

अकोला जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण(२०११)जनगणना अहवाल नुसार साक्षरता प्रमाण
एकूण ८८.५५ %
पुरूष ९२.८९ %
स्त्री ८१.५१ %