नरनाळा किल्ला
दिशाअकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट वयाघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासुन गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.
भौगोलिक माहिती
गड जमीनीपासून ३१६१ फुट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकर असून गडाच्या कोटाची (तटबंदी) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.
किल्ल्याबद्दल
गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गुळफुटाने वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.
कसे पोहोचाल?:
रस्त्याने
बस सेवा राष्ट्रीय महामार्ग 6 अकोल्याच्या मधोमध कोलकात्यातून जातो. राष्ट्रीय महामार्ग 6 हा एशिया राज मार्ग 46 चा भाग आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अकोला जिल्ह्यातील अनेक ग्रामीण गावांना जोडतो. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची आणि खासगी वाहतूक व्यवस्था बसमध्ये अकोला ते इतर प्रमुख शहरांशी जोडतात, त्या शहरांना नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, नांदेड, हैदराबाद, मुंबईशी जोडतात. अकोला - अकोट - 45 कि.मी. अकोट - नरनाळा - 22 कि.मी.