बंद

सालासर बालाजी मंदिर

दिशा

सालासर मंदिर ची स्थापना गंगा नगर अकोला येथे वर्ष २०१४ मध्ये झाली. येथे श्री हनुमानजी,श्री राम दरबार, श्री राधाकृष्ण आणि श्री शिव परिवार यांची मूर्ती आहेत.
मंदिराचा परिसर २ लाख चौ.फूट असून त्यामध्ये बगीचा आहे.

कसे पोहोचाल?:

विमानाने

अकोला विमान तळ अकोला शहरापासून ७ किमी अंतरावर स्थित आहे.हे विमानतळ शिवणी विमान तळाच्या नावाने देखील ओळखल्या जाते. अकोला विमानतळ राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वर स्थित आहे, नागपूर(२५० किमी ) आणी औरंगाबाद(२६५ किमी ) हे अकोला जवळील अंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

रेल्वेने

अकोला रेल्वे स्टेशन मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, राजकोट, ओखा, सुरत, नांदेड, जोधपूर, बिकानेर, जयपुर, कोल्हापूर, पुणे या शहरांना जोडते . अकोला हे दोन ब्रॉड गेज लाईन हावडा-नागपूर -मुंबई आणि मिटर काचेगुडा जयपूर गेज लाईन वर स्थित आहे.

रस्त्याने

राष्ट्रीय महामार्ग ६ हा अकोल्याच्या मध्यातून कोलकत्ता कडे जातो. राष्ट्रीय महामार्ग ६ हा आशिया राज मार्ग ४६ चा एक भाग आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ हे अकोला जिल्यातील अनेक ग्रामीण गावांना जोडते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि खाजगी परिवहन सेवांच्या बसेस अकोल्याला इतर मुख्य शहराशी जोडतात, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, नांदेड, हैद्राबाद, मुंबई अशा शहराना ह्या सेवा जोडतात