योजना
विशेष सहाय्य योजना.
- संजय गांधी निराधार अनुदान योजना.
- श्रावणबाळ राज्य सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
- राष्टीय कुटुंब अर्थसहाय्य योजना
राज्यपुरस्कृत योजना
१. संजय गांधी निराधार अनुदान योजना.
पात्रता
* वय ६५ वर्षा खालील दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नसलेले किंवा रु 21000/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांस दरमहा रुपये 1500रु/- अर्थसहाय्य दरमहा देण्यात येते
*अंध, अपंग, शारिरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती विधवा, परित्यक्ता देवदासी या दुर्बल घटकांना अर्थसहाय्य दरमहा देण्यात येते
२. श्रावणबाळ राज्य सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
पात्रता
* 65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नसलेले निराधार व्यक्ती किंवा रु 21000/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांस दरमहा रुपये 1500रु/- अर्थसहाय्य दरमहा देण्यात येते
केंद्रपुरस्कृत योजना
३.इंदिरा गांधी राष्टीय अपंग निवृत्ती वेतन योजना
पात्रता
* या योजनेमध्ये दारिद्रय रेषेचे यादीत नाव असलेल्या व ६५ वर्षावरील सर्व
व्यक्ती पात्र ठरतील.
* ६५ ते ७९ वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना केंद्रशासना कडुन दरमहा २००रु.
राज्यशासनाकडुन १३०० रु अर्थसहाय्य देण्यात येते.८० वर्ष व त्यावरील वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा केंद्रशासना कडुन ५०० रु. व राज्यशासनाकडुन १००० रु अर्थसहाय्य देण्यात येते.
४.इंदिरा गांधी राष्टीय विधवा निवृत्ती वेतन योजना
पात्रता
- या योजनेमध्ये दारिद्रय रेषेचे यादीत नाव असलेल्या ४० ते ७९ विधवा लाभार्थ्याला केंद्रशासना कडुन दरमहा ३०० रु. व राज्यशासनाकडुन १२०० अर्थसहाय्य देण्यात येते.
५. इंदिरा गांधी राष्टीय अपंग निवृत्ती वेतन योजना
पात्रता
* या योजनेमध्ये दारिद्रय रेषेचे यादीत नाव असलेल्या व १८ ते ७९ वर्ष
वयोगटातील अपंग व्यक्ती पात्र ठरतील.
* केंद्रशासना कडुन दरमहा ३०० रु.व राज्यशासनाकडुन १२०० रु अर्थसहाय्य
देण्यात येते.
राष्टीय कुटुंब अर्थसहाय्य योजना
पात्रता
१ या योजनेमध्ये मयत व्यक्तीचे नाव दारिद्रय रेषेचे यादीत नाव असणे आवश्यक
२ मयत व्यक्तीचे वय १८ ते ५९ वर्ष वयोगटातील असणे आवश्यक
३ मयत व्यक्ती ही कुटुंबातील कर्ता स्त्री/पुरुष असणे आवश्यक
४ मृत्यु दिनांकापासुन ३ वर्षाच्या आत अर्ज करण्यात यावा
५ केंद्रशासना कडुन एकरकमी २०००० रु. अर्थसहाय्य देण्यात येते