बंद

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 

UPSC/MPSC सारख्‍या स्‍पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विदयार्थ्‍यांना बरेचदा पुरेशे प्रयत्‍न करुनही योग्‍य व्‍यक्‍तीकडुन, योग्‍यवेळी , योग्‍य ते मार्गदर्शन मिळत नसल्‍यामुळे त्‍यांना परीक्षेत यश प्राप्‍त होत नाही, किंवा यश अतिशय विलंबाने मिळते. विदयार्थ्‍यांचे ही मार्गदर्शनाची उणिव भरुन काढण्‍यासाठी व त्‍यांच्‍या मध्‍ये स्‍पर्धात्‍मक भावना निर्माण होऊन त्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढण्‍याचे हेतूने अकोला जिल्‍हा प्रशासनाने स्‍पर्धा परिक्षा मार्गदर्शन हा उपक्रम दि. ५ जुलै २०१५ पासून सुरु केला आहे.
या उपक्रमांतर्गत दर महिन्‍याच्‍या ५ तारखेला सांयकाळी ५.०० वाजता प्रमिलाताई ओक हॉल येथे UPSC/MPSC उत्‍तीर्ण अधिका-यांचे प्रत्‍यक्ष मार्गदर्शन उपलब्‍ध करवून देण्‍यात येते या उपक्रमाचाच एक भाग म्‍हणून विदयार्थ्‍यांचे लेखन कौशल्‍य, वक्‍तृत्‍व, सामान्‍यज्ञान, समयसूचकता, प्रसंगावधान आदि कौशल्‍य विकसित होण्‍याचे दृष्‍टीने प्रत्‍येक महिन्‍याच्‍या ०१ तारखेला जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथे विविध स्‍पर्धांचे आयो‍जनही करण्‍यात येते, या माध्‍यमातून होतकरु व प्रयत्‍नवादी विदयार्थ्‍यांचा शोध घेवून त्‍यांच्‍याकरिता काही अधिका-यांना मेंटॉरशिप (Mentorship) देण्‍याच्‍या प्रशासनाचा मानस आहे.
त्‍याकरिता अकोला जिल्‍हयाचे भूमिपूत्र असलेले UPSC/MPSC परिक्षा उत्‍तीर्ण झालेल्‍या अधिका-यांकडुन या उपक्रमाकरिता मेंटॉरशिप स्विकारण्‍याकरिता आव्‍हान करण्‍यात येत आहे. मेंटॉरशिप स्विकारलेल्‍या अधिका-यांशी संबधित तयारी करणा-या विदयार्थ्‍यांने संपर्क साधून त्‍यांचेकडुन गरजेनुसार, व अधिका-यांच्‍या सोईनुसार, मार्गदर्शन प्राप्‍त करुन घेणे अपेक्षित आहे.
यादृष्‍टीने अकोला जिल्‍हयातील UPSC/MPSC उत्‍तीर्ण अलिकडच्‍या काळातील (३ ते ४ वर्षापूर्वीच्‍या) अधिका-यांनी समन्‍वयक, श्री. प्रकाश अंधारे, मो. नं ८४८४९०६९९२, या क्रमांकावर किंवा akolaandhare@gmail.com या e-mail वर संपर्क साधावा असे आव्‍हान श्री.आस्तिक कुमार पाण्डेय (भा.प्र.से) जिल्‍हाधिकारी अकोला. यांनी केले आहे.