बंद

आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभाग

आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभाग

  • आपत्ती पूर्वतयारी: आपत्ती येण्यापूर्वी जोखीम ओळखणे, आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करणे, पुर्वतयारीच्‍या अनुषंगाने नागरीकांना प्रशिक्षण देणे आणि जन जागरूती करणे.
  • आपत्कालीन प्रतिसाद: नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती (उदा. पूर, भूकंप, दुष्काळ, अपघात) घडल्यास तात्काळ बचावकार्य, मदत आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे.
  • समन्वय: स्थानिक प्रशासन, पोलिस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि स्वयंसेवी संस्थांसोबत समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे करणे.
  • पुनर्वसन आणि पुनर्बांधणी: आपत्तीनंतर प्रभावित लोकांचे पुनर्वसन करणे, पायाभूत सुविधांची दुरुस्ती करणे आणि जीवन सामान्य स्थितीत आणणे.
  • जोखीम कमी करणे: भविष्यातील आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक / सौम्‍यीकरण उपाययोजना राबवणे

कार्य

आपत्‍तीपुर्व आपत्‍ती दरम्‍यान व आपत्‍ती नंतर आवश्‍यक व प्रभावी उपाय योजना करणे

  • आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करणे आणि नागरीकांचे प्राण वाचवणे.
  • आपत्तींची शक्यता आणि परिणाम कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवणे.
  • आपत्तीच्या वेळी जलद आणि प्रभावी मदत प्रदान करणे.
  • लोकांना आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सक्षम आणि जागरूक बनवणे.
  • आपदग्रस्‍ताना दुष्‍काळ,टंचाई स्थितीमध्‍ये तातडीने मदत उपलब्‍ध करणे.
  • चारा टंचाई, पाणी टंचाई स्थितीमध्‍ये प्रभावी उपाययोजना करणे.
  • आपत्तीच्या आधी, दरम्यान आणि नंतर अचूक माहिती गोळा करून लोकांपर्यंत पोहोचवणे.
  • शेतकरी आत्‍महत्‍या विषयक प्रकरणांच्‍या अनुषंगाने आवश्‍यक माहिती संकलन करून जिल्‍हा स्‍तरीय बैठक आयोजित करणे व पात्र कुटुंबांना तातडीने मदत वितरीत करणे.
  • शेतीपिक नुकसान, घरांचे नुकसान, पशुधन नुकसान, जखमी/मृत व्‍यक्‍तीच्‍या कायदेशीर वारसांना मदत वितरीत करणे.

योजना

शासन निर्णय क्रमाांक: सीएलएस-2022/प्र.क्र.349/म-3 दिनांक. 27 मार्च 2023 नुसार राज्‍य आपत्‍ती प्रतिसादी निधीमधुन सदर शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्‍या विविध आपत्‍तींना देय मदत पुढील प्रमाणे आहे.

  • (अ) आपद्ग्रस्‍त मृत व्‍यक्‍तीच्‍या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य
  • मृत व्‍यक्‍तीच्‍या वारसाांना रु.४.०० लाख इतकी मदत

  • (ब) अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य
    • 40% र्ते 60% अपंगत्‍व आल्यास रु 74,000/-
    • 60% हून अनधक अपंगत्‍व आल्यास रु.2.50 लाख इतकी मदत
  • क) जखमी व्‍यक्‍ती इस्पितळात दाखल झाला असल्यास
    • एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीकरीता इस्पितळात दाखल झाल्यास रु.16000/-
    • एक पेक्षा कमी कालावधीकनरर्ता दाखल झाला असल्यास रु.5400/-
  • (ङ) नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरीता क्षेत्र पाण्‍यात बुडाले असल्यास घरे पूर्णतः वाहून गेली असल्यास / पूर्णतः क्षतीग्रस्‍त झाली असल्यास कपडे/ भाांडी / घरगुती वस्‍तुकंरीता अर्थसहाय्य
    • प्रतीकुंटुब रु.2500/- झालेल्या नुकसानाकरीता
    • प्रतीकुंटुब रु. 2500/- घरगुती भांडी/ वस्‍तु नुकसानीकरीता
  • अ) शेती जमीनीवरील गाळ (वाळूचा / गाळांचा /मातीचा थर ३ इंचापेक्षा अधिक
    जमा होणे, राज्य आपत्‍ती प्रतिसाद निधी
  • ब) डोंगराळ शेत जमीनीवरील मातीचा ढिगारा (मलबा) काढणे.
  • क) मत्‍स्‍यशेती दुरूस्‍ती करणे/ मातीचा थर काढणे / पूर्ववत करणे.
    • प्रत्येक बाबीकरीता रु.18000/- प्रति हेक्‍टर प्रती शेतकरी
    • कमीत कमी अनुज्ञेय मदत रु.2200/- पेक्षा कमी नसावी.

    >li?ड) दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदी पात्र/प्रवाह बदलल्यामुळे शेत जमिन वाहून जाणे.

    • महसूल अभिलेखानुसार शेत जमीनीचे मालक असलेल्या फक्‍त अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना रु.47,000/- प्रनर्त हेक्टर या दराने मदत अनुज्ञेय राहील.
    • कमीत कमी अनुज्ञेय मतद रु.5,000/- पेक्षा कमी नसावी.
    • 3.. (अ) शेती पिके,फळ पिके आणि वार्षिक लावगवडीचे पिके
      • कोरडवाहू क्षेत्रासाठी रु.8,500/- प्रती हेक्टर आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत. कमीत कमी अनुज्ञेय मदत रु. 1000/- पेक्षा कमी नसावी आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत अनुज्ञेय राहील.
      • आश्‍वा‍सति जलसिंचन योजनेखालील क्षेत्रांकरीता रु.17,000/- प्रती हेक्‍टर कमीत कमी अनुज्ञेय मदत रु.2,000/- पेक्षा कमी नसावी आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत अनुज्ञेय राहील.
    • (ब) बहुवार्षिक पिके
      • बहुवार्षिक पिके प्रती हेक्टरी रु.22,500/ सदर मदत पेरणी केलेल्या क्षेत्राकरीताच अनुज्ञेय असून कमीत कमी अनुज्ञेय मदर्त रु.2,5००/- पेक्षा कमी नसावी
      • रेशीम उत्पादन
      • एरी, मलबेरी, टसर रेशमासाठी रु.6,000/- प्रती हेक्‍टर मुग रेशमासाठी रु.7,500/- प्रती हेक्टर कमीत कमी अनुज्ञेय मदत रु.1,000/- पेक्षा कमी नसावी आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत अनुज्ञेय राहील.

      (iii) 2 हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्‍त भूधारण करणा-या शेतक-यांना निवीष्‍ठा अनुदान

      • कोरडवाहू क्षेत्रासाठी रु.8,500/- प्रती हेक्‍टर आणि पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत,
      • आश्‍वासित जलसिंचन योजनेखालील क्षेत्राकरीता रु.17,000/- प्रती हेक्‍टर आणि पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत.
      • सर्व प्रकारच्या बहुवार्षिक पिकाकरीता रु.22,500/- प्रती हेक्टर आणि पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत . 33% अथवा त्यापेक्षा अधिक शेती पिकांचे नुकसान झाल्यास व २ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मर्यदेत अनुज्ञेय असेल.

     

    1. दुधाळ जनावरे ओढकाम करणारी जनावरे किंवा माल वाहतुकीसाठी वापरण्‍यात येणारी जनावरे दगावल्‍यास दिली जाणारी मदत
    • दुधाळ जनावरे : रू.37500/-म्हैस / गाय/उंट/याक/ मिथुन इत्यादी

    रु.4000/- मेंढी / बकरी / डुक्कर

    • ओढकाम करणारी जनावरे – रु.32,000/- उांट / घोडा/ बैल इत्यादी

    रू.20,000/- वासरू / गाढव / शिंगरू / खेचर जरी

    • कुक्‍कुटपालण ः- मदत रू.100/- प्रती कोंबडी, रू.10,000 /- प्रती कुटुंब मर्यादेत. कोंबडयांचा मृत्‍यु हा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला असणे आवश्यक.
    1. Recovery & Reconstruction: (30% Of SDRMF i.e. Equal To 37.50% Of SDRF Allocation for the year)

    अ) पूर्णतः नष्‍ट / पडझड झालेली घर

    1) पक्की घर ः- सखल भागांसाठी बाधित घरांसाठी रु.1,20,000/ प्रती घर

    2) कच्ची घर ः- डोंगरी भागातील बाधित घरांसाठी रु. 1,30,000/- प्रती घर

    ब) अंशत: पडझड झालेली घरे (झोपडी वगळुन) जेथे किमान १५% पडझड झाली असल्यास –

    1) पक्की घर ः- रु.6,500/- प्रती घर

    2) कच्ची घर ः- रु.4,000/- प्रती घर

    क) पडझड / नष्ट्ट झालेल्या झोपडया

    1) रु.8,000/- प्रती झोपडी (झोपडी म्हणजे तात्‍पुरते कामचालवू झोपडे, कच्च्या घरापेक्षा तकलादु , झावळया, माती, प्‍लास्‍टीक इत्यादीपासून तयार केलेले राज्य व जिल्‍हा स्‍तरीय अधिका-यांनी झोपडे म्हणून प्रमाणित केलेले)

    ड) घराला जोडून असलेला गोठा

    1) रु.3,000/- प्रती गोठा

     

    • शासन निर्णय क्र.एससीवाय-1205/प्र.क्र.189/म-7 दि.23 जानेवारी 2006 नुसार

    शेतकरी आत्‍महत्‍या सदर शासन निर्णयानुसार निश्चित केलेली देय मदत पुढील प्रमाणे

    1) संबंधीत आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतक-यांच्‍या वारसांना रू. 1 लक्ष इतकी मदत देय आहे.

अ‍.क्र. सेवेचे नाव लिंक
1 मौसम विभागा अंतर्गत दर्शविण्‍यात येत असलेल्‍या हवामानची स्थिती https://mausam.imd.gov.in/
2 आपत्‍ती व्‍यवस्‍थापनअंतर्गत शासकीय विभागस्‍तरावर उपलब्‍ध साहित्‍य https://idrn.nidm.gov.in/

 

3 नैसर्गिक आपत्‍ती मुळे शेती पिकाच्‍या नुकसानीचे शेतक-यांना मिळत असलेल्‍या आर्थिक मदत वाटपाच्‍या स्थीतीची तपासणी https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus
4 नागपुर विभागंतर्गत मौसम दर्शविण्‍यात येत असलेल्‍या हवामानची स्थिती https://.imdnagpur.gov.in/