• साईट मॅप
  • Accessibility Links
बंद

कसे पोहोचाल?

ठिकाण

अकोला मध्य भारतात महाराष्ट्र राज्यात विदर्भात अकोला एक जिल्हा आहे. हा जिल्हा मुंबई पासून ६०० किमी  पूर्व आणि नागपूर  पासून २५० किमी पश्चिमेला आहे. अकोला हा अमरावती विभागातील मधील एक जिल्हा मुख्यालय आहे.

वाहतूक:-

विमानतळ

अकोला विमान तळ अकोला शहरापासून ७ किमी अंतरावर स्थित आहे.हे विमानतळ शिवणी विमान तळाच्या नावाने देखील ओळखल्या जाते. अकोला विमानतळ राष्ट्रीय महामार्ग क्र  ६ वर स्थित आहे, नागपूर(२५० किमी ) आणी  औरंगाबाद(२६५ किमी ) हे अकोला जवळील अंतरराष्ट्रीय  विमानतळ आहे.

अकोलाविमानसेवा

विमानसेवा

रेल्वे

अकोला रेल्वे स्टेशन मुंबई, दिल्ली,  अहमदाबाद, राजकोट, ओखा, सुरत, नांदेड, जोधपूर,  बिकानेर, जयपुर,  कोल्हापूर, पुणे या शहरांना जोडते . अकोला हे दोन ब्रॉड गेज लाईन हावडा-नागपूर -मुंबई  आणि मिटर काचेगुडा जयपूर गेज लाईन  वर स्थित आहे.

अकोलारेल्वेसेवा

रेल्वेसेवा

बस सेवा

राष्ट्रीय महामार्ग ६ हा अकोल्याच्या मध्यातून कोलकत्ता कडे जातो. राष्ट्रीय महामार्ग ६ हा आशिया राज मार्ग ४६ चा एक भाग आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ हे अकोला जिल्यातील अनेक ग्रामीण  गावांना जोडते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि खाजगी परिवहन सेवांच्या बसेस अकोल्याला इतर मुख्य शहराशी जोडतात, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, नांदेड, हैद्राबाद, मुंबई अशा शहराना ह्या सेवा जोडतात

अकोलाबससेवा

बससेवा