1. आनंदाचा शिधा:
- दिवाळी उत्सव 2022 निमित आनंदाचा शिधा वितरण
- गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादि आदी 2023: आनंदाचा शिधा वितरण
- गौरी-गणपती आणि दिवाळी उत्सव 2023: आनंदाचा शिधा वितरण
- श्रीराम प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2024: आनंदाचा शिधा वितरण
लाभार्थी: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच APL शेतकरी रेशनकार्ड धारक जे 14 शेतकरी आत्महत्या प्रभावित जिल्ह्यांतील आहेत (औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा).
लाभ: प्रत्येक रेशनकार्डसाठी 1 शिधा किट
2. किमान आधारभूत किमत (MSP)
योजनेचा उद्देश: केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत विविध अन्नधान्याच्या किमान किंमती जाहीर केल्या जातात. शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून सरकार न्याय्य दर्जाच्या (FAQ) धान्याची खरेदी करते.
अंमलबजावणी यंत्रणा:
- नोडल एजन्सी: भारतीय अन्न महामंडळ (FCI)
- राज्यस्तरीय कार्यान्वयन:
- महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ, मुंबई (गैर-आदिवासी क्षेत्र)
- महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक (आदिवासी क्षेत्र)
- नोंदणी व खरेदी प्रक्रिया: संपूर्ण प्रणाली NEML द्वारे ऑनलाइन
लाभार्थी:
- MSP योजनेअंतर्गत नोंदणी केलेले शेतकरी
लाभ:
- MSP रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा
अर्ज कसा करावा?
- Mahanondani अॅप किंवा जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी
- आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक / रद्द केलेला धनादेश
- नवीन 7/12 उतारा
3. APL शेतकरी DBT योजना
योजनेचा उद्देश: शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी APL कार्डधारक शेतकऱ्यांना ₹150/- प्रतिमाह थेट आर्थिक मदत.
लाभार्थी:
- औरंगाबाद, अमरावती व वर्धा जिल्ह्यातील APL शेतकरी
लाभ:
अर्ज कसा करावा?
- तालुका कार्यालयात भेट द्या
4. एक देश एक शिधापत्रिका
- ही योजना 1 जानेवारी 2020 पासून लागू आहे.
- आधार प्रमाणीकरणाद्वारे कोणत्याही राज्यातील रास्तभाव दुकानातून धान्य उचलण्याची सुविधा.
- स्थलांतरित कामगारांसाठी ई-POS पोर्टेबिलिटी सुविधा.
- हेल्पलाईन क्रमांक: 14445
लाभार्थी: सर्व राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभार्थी
फायदे: रेशन कार्ड प्रकारानुसार अन्नधान्य
5. शिवभोजन
राज्यातील गरीब व गरजू जनतेसाठी ₹10 दरात भोजन.
भोजनामध्ये: 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण, 1 वाटी भात
वेळ: सकाळी 11.00 ते दुपारी 3.00
लाभार्थी: कोणतीही व्यक्ती
6. अंत्योदय अन्न योजना (ए.ए.वाय.)
अत्यंत गरीब कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य पुरवठा.
लाभार्थी: अ.अ.यो. शिधापत्रिकाधारक
फायदे: दरमहा 35 किलो अन्नधान्य (सध्या मोफत)
अर्ज कसा करावा? जवळच्या रेशनिंग कार्यालयात किंवा ऑनलाईन प्रणालीद्वारे.