आपत्ती व्यवस्थापन विभाग
आपत्ती व्यवस्थापन/ नैसर्गिक आपत्ती कक्ष
• आपत्ती व्यवस्थापन कायदा – 2005
केंद्र शासनाने सन 2005 मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारीत केला आहे.या कायदयाव्दारे आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रभाविपणे यंत्रणा सज्ज करणे याला कायदेशीर महत्व प्राप्त झाले आहे. आपत्तीमध्ये होणारी जिवीतहानी व वित्तहानी कमी करण्यासाठी व आपत्तीचा प्रतिबंध करण्यासाठी आपत्तीपूर्व काळात करावयाची पूर्वतयारी यावर या कायद्यामध्ये विशेष भर देण्यात आला आहे.तसेच आपत्तीच्या प्रसंगामध्ये शोध व बचाव कार्य गतीमान पध्दतीने व सुसूत्रपणे राबविता यावे यासाठी प्रशिक्षण व प्रचार प्रसिध्दी यांचे महत्व या कायद्यामध्ये अधोरेखीत केले आहे.
• अकोला जिल्हा आपत्तीप्रवण विशेषतः
पूरप्रवण असल्याने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करतांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सर्व सदस्यांना तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत सर्व शासकीय विभाग, सार्वजनिक प्राधिकरणे व स्वयंसेवी संस्था यांचेशी समन्वय ठेवून अकोला जिल्हयाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
• विविध आपत्तीच्या धोका कमी करण्यासाठी आपत्तीपुर्व ,आपत्ती दरम्यान व आपत्तीनंतर उपाययोजना करण्याचे अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे वतीने कार्यवाही करण्यात येते.
• अतिवृष्टी ,पुर,विज,भुकंप अशा विविध प्रकारच्या केंद्र व राज्य शासनाने निश्चित केलेल्या आपत्तीच्या अनुषंगाने मदत देण्याची कार्यवाही महसूल व वनविभाग शा.नि. 27 मार्च 2023 नुसार करण्यात येते.
• मृत व्यवक्ती ,मृत पशुधन,घरांचे नुकसान ,शेतीपिकाचे नुकसान झाल्यास महसूल व वनविभाग शा.नि. 27 मार्च 2023 नुसार मदत देण्याची कार्यवाही करण्यात येते.
• जिल्हयात दुष्काळ स्थिती निर्देशनास आल्यास दुष्काळ व्यवस्थापन संहीता 2016 नुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येते.
• या शिवाय मानवनिर्मित आपत्तीच्या अनुषंगाने मदत देण्याची कार्यवाही करण्यात येते.
• पाणी टंचाई ,चारा टंचाई निर्माण झाल्यास याबाबत आवश्यक कार्यवाही सदर कक्षाचे माध्यमातुन करण्यात येते.
• जिल्हयातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त प्रकरणांचे अनुषंगाने जिल्हास्तरीय समिती कार्यरत असुन सदर प्रकरणाबाबत समितीच्या सभेमध्ये निर्णय होउुन मदत देण्याचे कार्यवाही करण्यात येते
अधिक माहितीसाठी कृपया नैसर्गिक आपत्ती कक्ष, नवीन इमारत पहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे संपर्क साधावा.