बंद

संजय गांधी योजना विभाग

संजय गांधी योजना विभाग

जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला येथील संजय गांधी योजना विभाग जिल्‍हातील तालुका स्‍तरावरील संजय गांधी निराधार योजना संबंधित सर्व बाबीवर देखरेख, मार्गदर्शन व नियंत्रण ठेवण्‍याचे कार्य करतो तहसिल कार्यालयाशी समन्‍वय साधुन योजने संबंधीत कामकाज वेगाने व प्रभावी काम करुन घेतो.

ठळक वैशिष्‍टे:-

  • संजय गांधी निराधार योजना/श्रावणबाळ योजना राज्‍य पुरस्‍कृत योजनेमध्‍ये सरासरी 1500 रु. अनुदान लाभार्थ्‍यांना पुरविले जाते.
  • इंदिरा गांधी योजना मध्‍ये केंद्र सरकार कडुन 300 रु. अनुदान व राज्‍य सरकार  1200 रु. अनुदान मिळुन पुर्ण 1500 रु. लाभ लाभार्थ्‍यांना पुरविले जाते.
  • राष्‍ट्रीय कुटुंब लाभचे अनुदान एक वेळा एक रक्‍कमी 20000/-रु.लाभार्थ्‍यांना   दिले जाते.
  • डी.बी.टी. पोर्टल (Direct Benefit Transfers) मार्फत लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍यात अनुदान जमा केले जाते.

उदिष्‍टे व कार्य:-

  • सामाजिक न्‍याय व विशेष सहाय विभाग यांच्‍या शासन निर्णय क्रमांक विसयो -2018 /प्र.क्र.62/विसयो दिनांक 20 ऑगस्‍ट, 2019 नुसार
  • संजय गांधी निराधार योजना लाभार्थी यांना योजनेचा लाभ मिळवुन देणे.
  • तसेच लाभार्थ्‍यांच्‍या तक्रार अर्जाचे निवारण करुन लाभार्थ्‍यांचे समाधान करणे.
  • जास्‍तीत जास्‍त लाभार्थ्‍यांची डी.बी.टी. करुण घेणे. डी.बी.टी.(Direct Benefit Transfers) बाबत नस्‍ती हाताळणे.
  • तालुका आस्‍थापनेवर कार्यरत अधि/कर्मचारी यांचे वेतन अनुदान वितरण करणे.
  • मंत्रालय व आयुक्‍त कार्यालयाशी पत्रव्‍यवहार करणे.

योजना

विशेष सहाय्य योजना.

  • संजय गांधी निराधार अनुदान योजना.
  • श्रावणबाळ राज्‍य सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्‍तीवेतन योजना.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्‍तीवेतन योजना.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्‍तीवेतन योजना
  •  राष्‍टीय कुटुंब अर्थसहाय्य योजना

राज्‍यपुरस्‍कृत योजना

१. संजय गांधी निराधार अनुदान योजना.

पात्रता

* वय ६५ वर्षा खालील दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नसलेले   किंवा रु 21000/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांस दरमहा रुपये 1500रु/- अर्थसहाय्य दरमहा देण्‍यात येते

*अंध, अपंग, शारिरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती विधवा, परित्‍यक्‍ता देवदासी या दुर्बल घटकांना अर्थसहाय्य दरमहा देण्‍यात येते

 २. श्रावणबाळ राज्‍य सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना

पात्रता

*  65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नसलेले निराधार व्‍यक्‍ती किंवा रु 21000/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांस दरमहा रुपये 1500रु/- अर्थसहाय्य दरमहा देण्‍यात येते

केंद्रपुरस्‍कृत योजना

३.इंदिरा गांधी राष्‍टीय अपंग निवृत्‍ती वेतन योजना

पात्रता

*  या योजनेमध्‍ये दारिद्रय रेषेचे यादीत नाव असलेल्‍या व ६५ वर्षावरील सर्व

व्‍यक्‍ती पात्र ठरतील.

*  ६५ ते ७९ वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थ्‍यांना केंद्रशासना कडुन दरमहा २००रु.

राज्‍यशासनाकडुन १३०० रु अर्थसहाय्य देण्‍यात येते.८० वर्ष व त्‍यावरील वयोगटातील पात्र लाभार्थ्‍यांना दरमहा केंद्रशासना कडुन ५०० रु. व राज्‍यशासनाकडुन १००० रु   अर्थसहाय्य देण्‍यात येते.

४.इंदिरा गांधी राष्‍टीय विधवा निवृत्‍ती वेतन योजना

पात्रता  

  • या योजनेमध्‍ये दारिद्रय रेषेचे यादीत नाव असलेल्‍या ४० ते ७९ विधवा लाभार्थ्‍याला केंद्रशासना कडुन दरमहा ३०० रु. व राज्‍यशासनाकडुन १२०० अर्थसहाय्य देण्‍यात येते.

५. इंदिरा गांधी राष्‍टीय अपंग निवृत्‍ती वेतन योजना

पात्रता 

*    या योजनेमध्‍ये दारिद्रय रेषेचे यादीत नाव असलेल्‍या व १८ ते ७९ वर्ष

वयोगटातील अपंग व्‍यक्‍ती पात्र ठरतील.

*    केंद्रशासना कडुन दरमहा ३०० रु.व राज्‍यशासनाकडुन १२०० रु अर्थसहाय्य

देण्‍यात येते.

राष्‍टीय कुटुंब अर्थसहाय्य योजना

पात्रता

१  या योजनेमध्‍ये मयत व्‍यक्‍तीचे नाव दारिद्रय रेषेचे यादीत नाव असणे आवश्‍यक

२  मयत व्‍यक्‍तीचे वय १८ ते ५९ वर्ष वयोगटातील असणे आवश्‍यक

३  मयत व्‍यक्‍ती ही कुटुंबातील कर्ता स्‍त्री/पुरुष असणे आवश्‍यक

४  मृत्‍यु दिनांकापासुन ३ वर्षाच्‍या आत अर्ज करण्‍यात यावा

५  केंद्रशासना कडुन एकरकमी २०००० रु. अर्थसहाय्य देण्‍यात येते