खनिकर्म विभाग
जिल्हाधिकारी अकोला कार्यालयातील खनिकर्म विभाग प्रामुख्याने खनिज संसाधनांचे जबाबदारीने व्यवस्थापन आणि उपयोग सुनिश्चित करतो. यामध्ये भूवैज्ञानिक सर्वेक्षण करणे, खाण परवाने जारी करणे आणि नियमांचे पालन होत आहे की नाही याची खातरजमा करणे यांचा समावेश होतो.
गौणखनिज हे कोणत्याही बांधकामाचा मुख्य कणा असल्यामुळे कोणत्याही राष्ट्राच्या औदयोगीक पायाभुत सुविधांच्या विकासासाठी महत्वाची भुमिका बजावते तसेच शासनाच्या महसुल वसुलीमध्ये महत्वाचा स्त्रोत असल्याची भुमिका बजावते. त्यामुळे खनिज हे राज्यांचा खजिना असल्याचे ओळखले जाते व त्यानुसार खनिजांवर देखरेख ठेवणे व त्यांच्या निष्काशनाबाबत राज्यात उपयुक्त नियमावली व निर्णय जारी केले जातात. त्यानुसार महाराष्ट्र राज्यासाठी खान व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम 1957 च्या आधारे महाराष्ट्र गौण खनिज उत्खन्न (विकास व विनियमन) नियम 2013 जारी केलेला आहे. त्यानुसार अकोला जिल्हयात आढळुन येणा-या गौण खनिजाच्या निष्काशनाबाबत खालीलप्रमाणे गौणखनिज शाखेतून कार्यवाही केली जाते.