• साईट मॅप
  • Accessibility Links
बंद

उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट

अकोट हे महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एक शहर आहे. अकोटचा समवेश अमरावती महसूल विभागाअंतर्गत होतो.

अकोला जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या उत्तरेला 45 किमी अंतरावर स्थित असून अकोट तालुका मुख्यालय म्हणून कार्य करते.

अकोट येथे एक उपविभागीय कार्यालय आहे,  या उपविभागाअंतर्गत तहसील कार्यालय अकोट व तहसील कार्यालय तेल्हारा ही दोन कार्यालय आहेत.

अ.क्र. अधिकाऱ्यांचे नाव

 

पदनाम

 

दूरध्वनी क्रमांक

 

1. डॉ.सुनील चव्हाण तहसीलदार अकोट 07258-222625
2. समाधान सोनवणे तहसीलदार तेल्हारा 07258-231336

उपविभागीय अधिकारी (SDO), ज्यांना उपविभागीय दंडाधिकारी (SDM) देखील म्हणतात, हे उपविभागाचे प्रमुख नागरी अधिकारी असतात.  ते जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीन राहून शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी व समन्वय साधतात. त्यांची जबाबदारी महसूल, कार्यकारी व अर्धन्यायिक बाबींवर असते.

महसूल व कार्यकारी कार्ये:

समन्वय व देखरेखः

  • SDO/SDM उपविभागातील तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा समन्वय व देखरेख करतात.

महसूल विषयक कार्यः

  • जमिनीच्या महसूल मूल्यांकनापासून ते महसूल वसुलीपर्यंतच्या सर्व प्रक्रियांचे निरीक्षण आणि देखरेख करतात.

प्रतिनिधिक अधिकारः

  • जिल्हाधिकाऱ्यांकडून काही विशिष्ट कायद्यांतर्गत त्यांना अधिकार प्रदान केले जातात, ज्यामुळे ते महसूल विषयक बाबतीत प्रथम श्रेणी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्य करतात.

शासकीय मालमत्ताः

  • शासकीय मालमत्तेचे संरक्षण करणे, अतिक्रमण रोखणे आणि जमिनीच्या भाडेधारणा अटींचे उल्लंघन हाताळणे.

भू-राजस्व (लँड रेव्हेन्यू):

  • बिगर शेती मूल्यांकन आकारणी, विविध महसूल विषयक आदेश पारित करणे आणि सरकारी महसूल वसुलीचे निरीक्षण करणे.

जमिनीचे अधिग्रहणः

  • जमिनीच्या अधिग्रहण प्रक्रियेमध्ये विविध शासकीय उपक्रमांसाठी लागण्याऱ्या जमीन अधिग्रहण प्रक्रीयेमध्ये भूसंपादन अधिकारी म्हणून कार्य करतात.

अपीलः

  • तहसीलदारांनी घेतलेल्या महसुली व इतर निर्णयांविरुद्ध अपील ऐकणे

पीक व सीमांकन निरीक्षणः

  • पीक आणि हद्द चिन्हांची तपासणी करणे तसेच महसूल सवलती आणि सवलतीसाठी पीक उत्पादनाच्या अंदाजांची पडताळणी करणे.

उत्तराधिकार:

  • वतन (पारंपरिक जमीनधारण) आणि इतर मालमत्तेच्या उत्तराधिकार प्रकरणे हाताळणे.

विकास विषयक कार्य:

  • महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि सार्वजनिक आरोग्य यांसारख्या विभागांच्या अधिकाऱ्यांच्या कामाचा समन्वय साधणे.

 

Manoj

मनोज लोणारकर  उपविभागीय अधिकारी अकोट

संपर्क क्रमांक :- 9767544555

मेल sdo.akot@rediffmail.com

अ.क्र. अधिकारी/कर्मचारी यांचे नाव पदनाम संपर्क क्रमांक प्रशासकीय कामकाजाचे स्वरूप सविस्तर पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम संपर्क क्रमांक
1. मनोज लोणारकर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अकोट 9767544555 उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट व तहसील अकोट/तेल्हारा येथील कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षण  जिल्हाधिकारी अकोला  
2. अनिकेत पुंडकर नायब तहसीलदार 9689278558 कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षण उपविभागीय अधिकारी अकोट 9767544555
3. विवेक मानकिकर लघुलेखक निम्नश्रेणी 9850442860 1.मा.उ.वि.अ.यांची दैनंदिनी,

2.लोकशाही दिन कामकाज,

3.निवडणूक विषयक,

4.मिटिंग नोट्स व दौरा दैनंदिन,

5.दररोज येणारे ई-मेल संदेशाची प्रिंट काढून मा.उ.वि.अ.अकोट यांचे अवलोकार्नार्थ सादर करणे.

6.जलयुक्त शिवार, विविध आयोजित सभांचे कामकाज करणे तसेच मा.उ.वि.अ.अकोट यांनी दिलेले विषय हाताळणे.

उपविभागीय अधिकारी अकोट 9767544555
4. शैलेश गायकवाड सहाय्यक महसूल अधिकारी (शिरस्तेदार) 9049149740 १. शासकीय जमीन मंजुरातीबाबतचे / हस्तांतरणाबाबतचे प्रकरणे हाताळणे.

२.गुंठेवारी अधिनियम अंतर्गत प्रकरणे, अकृषक आकारणी निश्चीत करणे

३.निवासी, औद्योगीक, वाणिज्य प्रयोजनाकरीता परवानगी संबधातील प्रकरणे तसेच अनाधिकृत अकृषक वापर संबंधातील प्रकरणे हाताळणे.

४.शासकीय जमीनीवरील अतिक्रमणाबाबतची प्रकरणे हाताळणे.

५.घरकुल मंजुरातीबाबतची प्रकरणे हाताळणे.

६. पेट्रोलियम, गॅस तसेच इतर प्रयोजनाकरीता जमीन मंजुराती संबंधित प्रकरणे व नस्ती हाताळणे.

७.अनाधिकृत धार्मीक प्रयोजनाकरीता शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमणे व नस्ती हाताळणे.

८.शासकीय जमीनीवरील निवासी, शेती प्रयोजनाकरीता झालेली अतिक्रमणे नियमानुकुल करण्याबाबतची प्रकरणे हाताळणे.

९.पुर्नवसन संबंधातील प्रकरणे हाताळणे.

१०.गौण खनिज उत्खनन परवनगी, अनाधिकृतरित्या गौण खनिज वाहतुक संबंधातील दंडात्मक कार्यवाहीची प्रकरणे /रेतीघाट हरयास  प्रकरणे / गौण खनिज पट्टा मंजुरातीबाबतचे चौकशी प्रकरणे हाताळणे / गौण खनिज संदर्भातील प्रदुषण नियंत्रण विषयक नस्ती हाताळणे. विस्फोटकाद्वारे गौण खनिज उत्खनन संबंधातील पत्रव्यवहार हाताळणे

११.मा. उपविभागीय अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे पार पाडणे

अनिकेत पुंडकर

नायब तहसीलदार

5. विष्णु मोरे सहाय्यक महसूल अधिकारी (प्रस्तुतकार-3) 8010370964 १.नझुल जमीनी बाबत प्रकरणे

२.लोकसभा/विधान सभा निवडणुका/जिल्हा परिषद निवडणूका

३.फौजदारी प्रकरणे / मर्ग समरी

४.फटाका परवान नुतनिकरण

५.कायदा व सुव्यवस्था संबंधीत बाबत

६.यात्रा, धामिक सण, विविध मोर्चे व निवेदन

७.पुरवठा विषयक बाबी

८.अज्ञान पालन कर्ता बाबत प्रकरणे

९.हैसियत दाखले

१०. मा.अविअ. अकोट यांनी वेळोवेळी दिलेल्या

आदेशानुसार कार्यवाही करणे.

अनिकेत पुंडकर

नायब तहसीलदार

9689278558
6. वैशाली एस तायडे महसूल सहाय्यक आस्थापना / नाझर 9766849318 १.आस्थापनेसंबंधित कार्य पार पाडणे.

२.नाझर संबंधित कार्य पार पाडणे.

३.पोलीस पाटील संबंधित कार्य पार पाडणे.

४.तलाठी आस्थापनासंबंधीत कार्य पार पाडणे.

५.जेष्ठ नागरिकाचे प्रकरण निकाली काढणे.

६.मा.अविअ. अकोट यांनी वेळोवेळी दिलेल्या

आदेशानुसार कार्यवाही करणे.

अनिकेत पुंडकर

नायब तहसीलदार

9689278558
7. आसिफशाह मन्नान शाह महसूल सहाय्यक

प्रस्तुतकार-1

9765515932 १.महसुली अपील प्रकरणे

२. सिलिंग जमीन विक्री प्रकरणे

३. तुकडेबंदी कायदा प्रकरणे विक्री/हस्तांतरण

४. आदिवासी ते आदिवासी शेत जमीन प्रकरणे

५. वनहक्क प्रकरणे

६. किरकोळ प्रकरणे

७. मा.अविअ. अकोट यांनी वेळोवेळी दिलेल्या

आदेशानुसार कार्यवाही करणे.

अनिकेत पुंडकर

नायब तहसीलदार

9689278558
8. किशोर पुंडकर महसूल सहाय्यक

सेतुलिपीक

9028806627 १.जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबतचे सर्व प्रशासकीय कामे, नॉन क्रिमिलेअर निर्गमित करण्याबाबतचे सर्व प्रशासकीय कामे

२.जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर पडताळणी बाबतचे सर्व प्रशासकीय कामे

३. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अंतर्गत कामे

४.S.T.P. रिफंड व्हाऊचर बाबत कामे

५. मा.अविअ. अकोट यांनी वेळोवेळी दिलेल्या

आदेशानुसार कार्यवाही करणे.

अनिकेत पुंडकर

नायब तहसीलदार

9689278558
9. लक्ष्मीकांत पांडे महसूल सहाय्यक

आवक जावक विभाग

8805368937 १.आवक-जावक विषयक सर्व प्रशासनिक कामे पार पाडणे व नोंदवह्या अद्यावत करणे

२.नैसर्गिक आपत्ती

३. मा.अविअ. अकोट यांनी वेळोवेळी दिलेल्या

आदेशानुसार कार्यवाही करणे.

अनिकेत पुंडकर नायब तहसीलदार 9689278558
10. गणेश पा. गोतमारे समन्वयक अधिकारी (भूसंपादन) 9922147422 १. भुसंपादन अधिनियम २०१३ व रेल्वे सुधारणा अधिनियम-२००८ अंतर्गत भूसंपादन प्रकरणे

२. मेळघाट व्याघ्र प्रकल्प पुनर्वसन

३. पालकमंत्री पाणंद रस्ते योजना

सांसद आदर्श ग्राम योजना,वाटरकप पाणी फौंडेशन

५. महापारेषण व सोलर कं. योजना अंतर्गत मुल्यांकन प्रकरणे

६. महाराजस्व अभियान, प्रपत्र ९ व प्रपत्र १० (भूसंपादन)

७. कोरोना कोविड -१९ चा साथरोग

८. मा.अविअ. अकोट यांनी वेळोवेळी दिलेल्या

आदेशानुसार कार्यवाही करणे.

अनिकेत पुंडकर नायब तहसीलदार 9689278558
11. विजय र.भोजने संगणक परिचालक

(भूसंपादन)

8446688414 १.भूसंपादन विषयक टंकलेखनाचे कामे करणे

२. मा.उपविभागीय अधिकारी अकोट यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे पार पाडणे

अनिकेत पुंडकर नायब तहसीलदार 9689278558
12. कुसुम सोळंके शिपाई 8888126918 १.मा.उपविभागीय अधिकारी अकोट यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे पार पाडणे अनिकेत पुंडकर नायब तहसीलदार 9689278558
उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय अकोट जि.अकोला
मंजूर पदसंख्या
अ.क्र. मंजूर पदे मंजूर संख्या रिक्त कार्यरत एकूण
1. उपविभागीय अधिकारी 1 0 1 1
2. नायब तहसीलदार 1 0 1 1
3. लघुलेखक 1 0 1 1
4. सहाय्यक महसूल अधिकारी 2 0 2 2
5. महसूल सहाय्यक 2 0 2 2
6. शिपाई 2 1 1 2
7. भूसंपादन समन्वयक 1 0 1 1
8. संगणक ऑपरेटर भूसंपादन 1 0 1 1
9. वाहन चालक 1 1 0 1
एकूण 12 02 10 12